Chicken Biryani Recipe in Marathi | चिकन बिर्याणी रेसिपी मराठीत | Chicken Guide

चिकन बिर्याणी बदल पूर्ण माहिती | चिकन बिर्याणी रिसिपी मराठीमध्ये | Chicken Guide | Chicken Biryani Recipe in marathi

Chicken Biryani Recipes Indian, Chicken Biryani Recipe in Marathi | Chicken Biryani Banane ki vidhi, Boneless Chicken Banane Ka Tarika

बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासणामध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.
मटन अथवा चिकन वापरून बनवली जाणारी बिर्याणी भारताच्या अनेक भागात तेथील स्थानिक नावांवरून ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, मालवणी बिर्याणी इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वेगळेपण आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते. (Chicken Biryani Recipe in Marathi)

  1. चिकन बिर्याणीचे विशेष फायदे (chicken biryani che vishesh fayade)

बरेचसे लोक बिर्याणी चवीमुळे खान पसंद करतात पण चवी सोबतच खुप सारे फायदे देखील बिर्याणी खाल्ल्यामुळे होतात. बिर्याणी बनवताना भात, चिकन, तूप, कांदा, टोमॅटो, हर्ब्स, दही वापरतात यामुळे बिर्याणीला छान चव येते सोबतच आपल्या आरोग्याला खुप फायदे सुद्धा होतात.
तांदुळ खाल्ल्याने शरीरातील चरबी आणि कोलेस्ट्रोलची पातळी वाढत नाही. तसच उकडलेला भात शरीरासाठी फायदेशीर असतो.
चिकनमध्ये मग्नेशिअम प्रमाण जास्त असल्याने फायदेशीर असते.
तांदळाप्रमाणे देशी तुप देखील शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी संतुलित ठेवण्याच काम करते. दिवसातून दोन चमचे तुप आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
बिर्याणी मध्ये लवंग, दालचिनी, हळद, तमालपत्र सारखे औषधी वनस्पतींचा वापर करतात. यामुळे महिलांमधील हार्मोनल समस्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

2. चिकन बिर्याणी जास्त पौष्टिक कशी बनवणार? (chicken biryani jast pausthik kashi banvnar?)

बिर्याणी बनवत असताना तेलाचा कमी वापर करा. कारण याचा परिणाम तुमच्या हृदयावर होऊ शकतो. तसच तांदळाऐवजी ब्राऊन राईस वापरू शकता तो आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असत. मातीच्या भांड असल्यास बिर्याणी त्यात बनवावी त्यामुळे बिर्याणीला छान चव येईल आणि ते आरोग्यासाठी पौष्टिक सुधा असते.

3. चिकन बिर्याणी बनवताना घ्यायची काळजी (chicken biryani banvtana ghyaychi kalaji)

चिकन, भात आणि कांदा समप्रमाणात घ्यावा जेणेकरून बिर्याणी चविष्ट होईल.
बिर्याणी साठीचा भात बनवताना तांदुळ छान धुऊन भिजवुन ठेवावा म्हणजे भात छान फुलून येईल. भात शिजवताना पाण्यात लिंबू पिळावा जेणेकरून भात पांढरा शुभ्र दिसेल. भात शिजल्यावर त्यात तुप घालावे जेणेकरून ते पुर्ण भाताला लागेल.
बिर्याणी बनवायच्या आधी चिकन मॅरीनेट करायला ठेवा ज्यामुळे चिकनला छान चव येईल.
चिकन आणि भात सुरवातीला अर्धवट शिजवा. त्यानंतर ते मध्यम आचेवर शिजवा म्हणजे त्याला छान चव येईल आणि ते नीट एकजीव होईल.
कांदा तळताना सुरवातीला मध्यम आचेवर तळाव नंतर हळु हळु आच वाढवावी जेणेकरून कांदा करपणार नाही आणि व्यवस्थित शिजेल. तसेच कांदा कापल्यावर त्याला मीठ लाऊन मग तळावा जेणेकरून कांदा कुरकुरीत होईल.

4. चिकन बिर्याणी कशी सर्व्ह करावी? (chicken biryani kashi sarv karavi?)

चिकन बिर्याणी गरम गरम एका प्लेट मध्ये काढुन त्यावर तुप घालाव. नंतर वरती पुदिना आणि कोथिंबीरची पान टाकून सजवावी. तुपामुळे बिर्याणीला छान चव येईल आणि पुदिना कोथिंबीर मुळे आकर्षकही दिसेल.

5. चिकन बिर्याणीला दम कसा द्यावा? (chicken biryanila dum kasa dyava?)

एका भांड्यात भात आणि चिकन चे थर लाऊन त्यावर झाकण ठेवाव. कणिक मळुन ते पीठ भांड्याच्या कडेला लाऊन सील कराव जेणेकरून भांड्यातली हवा भायेर जाणार नाही. तवा गरम करुन बिर्याणीच भांड तव्यावर ठेवाव म्हणजे बिर्याणी करपणार नाही आणि छान वाफेवर शिजेल.

6.चिकन बिर्याणी अधिक चविस्ट कशी बनेल? (chicken biryani adhik chavist kashi banel?)

चिकन बिर्याणी शिजल्यावर त्यावर कोथिंबीर आणि तुप घातल्यावर ते रुचकर लागेल. तसेच बिर्याणीवर तळलेले काजू घातले तर ती अधिक चविस्ट बनेल तसेच दिसायलाही आकर्षक दिसेल.

चिकन बिर्याणी रेसिपी (Chicken Biryani recipe in Marathi)

चमचमीत आणि झणझणीत, सर्वांची आवडती आणि करायला अगदी सोपी अशी चिकन बिर्याणी बनवायची रेसिपी पाहूया.

साहित्य

  • अर्धा किलो चिकन
  • अर्धा किलो बासमती तांदूळ
  • 400 ग्राम दही
  • 4 टेबलस्पून साजूक तूप
  • 2 टेबलस्पून आले पेस्ट
  • 2 टेबलस्पून लसूण पेस्ट
  • 2 टेबलस्पून हिरवी मिर्ची पेस्ट
  • पुदिना, आल, लसूण, हिरवी मिर्ची आणि कोथिंबीर पेस्ट ( हिरवी चटणी )
  • 2 दालचिनी तुकडे
  • 6 ते 7 हिरवी वेलची
  • 5 लवंग
  • जिरे
  • शहाजिरे
  • 3 वेलदोडे
  • 1/2 टेबलस्पून हळद
  • 1 टेबलस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 3 तमालपत्र
  • 3 ते 4 स्टार फुल
  • अर्धा किलो उभा चिरलेला कांदा
  • लिंबू
  • 2 तळलेले कांद्याचे काप
  • दुधात भिजवलेल केशर

कृती

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम भात शिजून घ्यावा. एका पातेल्यात पानी गरम करायला ठेवाव. त्यात अर्धा लिंबू पिळाव आणि थोड तेल घालुन त्यात तांदुळ घालावे आणि भात 80% शिजवाव.

भात शिजल्यावर त्यातल पानी बाजुला काढुन त्यावर थोडस तुप घालाव.
नंतर एका भांड्यात चिकन, एक टेबलस्पून आल, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, दही आणि मीठ टाकून एकजीव करुन घ्याव. हे चिकन मॅरीनेशन साठी तास भर ठेवाव.

बिर्याणी मसाला बनवण्यासाठी तवा गरम करुन त्यात लवंग, दालचिनी, वेलदोडे, मिरी, जिरे, वेलची आणि शहाजिरे टाकून थोडस गरम करुन त्याची मिक्सर मध्ये छान पावडर करुन घ्यावी. आपला बिर्याणी मसाला तयार आहे.

एका भांड्यात एक वाटी तेल घालुन त्यात तमालपत्र, स्टार फुल आणि उभा चिरलेला कांदा घालुन छान लालसर होईल पर्यंत परतावा. कांदा शिजल्यावर त्यात बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, 2 टेबलस्पून तुप आणि हिरवी चटणी घालुन परतावं. नंतर त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालुन छान एकजीव करुन चिकन शिजून घ्याव.

शिजलेल्या चिकन मधुन अर्ध चिकन काढुन घ्याव आणि उरलेल्या चिकन वर शिजलेला भात घालुन चिरलेली कोथिंबीर टाकावी. नंतर परत चिकन आणि भाताचा थर घालुन त्यावर दुघात भिजवलेल केशर आणि तुप घालाव आणि झाकण ठेवाव.

गॅस वर तवा गरम करावा आणि त्यावर बिर्याणीच भांड ठेऊन 15 ते 20 मिनिट मध्यम आचेवर शिजवाव.
एका प्लेट मध्ये काढुन गरम गरम चटपटीत चिकन बिर्याणी सर्व्ह करा. (Chicken Biryani Recipe in Marathi)


चिकन स्टाटर्स रेसिपी (Chicken Starter Recipe In Hindi) | Chicken Guide Review

चिकन ग्रेव्ही रेसिपी (Chicken Gravy Recipes In Hindi) | Chicken Guide Review

Boneless Chicken Recipe in marathi | बोनलेस चिकन रिसिपी मराठीमध्ये | Chicken Guide

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 58

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

We are sorry that this post was not useful for you!

Let us improve this post!

Tell us how we can improve this post?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.